Max Mharashtra Impact : मॅक्स महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश, पाकिस्तानच्या ताब्यातून आदिवासी खलाशांची सुटका

Fishermen Release from pakistan Jail : मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना पाकिस्तानने अटक केली होती. यानंतर मॅक्स महाराष्ट्रने या प्रकरणी आवाज उठवला होता. अखेर मॅक्स महाराष्ट्रच्या पाठपुराव्यानंतर आदिवासी खलाशांची सुटका करण्यात आली आहे.

Update: 2023-05-17 06:59 GMT

स्थानिक पातळीवर रोजगार मिळत नसल्याने रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या पालघरमधील शेकडो आदिवासी मच्छीमारांना पाकिस्तानात कैद करण्यात आले होते. त्यात डहाणू तालुक्यातील दोन तर तलासरी तालुक्यातील तीन अशा पाच मच्छीमारांचा समावेश होता. या खलाशांच्या सुटकेसाठी मॅक्स महाराष्ट्रने भूमिका घेत आवाज उठवला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

मॅक्स महाराष्ट्रने या घटनेला वाचा फोडत पाकिस्तानने अटक केलेल्या खलाशाच्या कुटूंबियांच्या हाल-अपेष्टांवर प्रकाश टाकत भयान वास्तव समोर आणले होते. त्यानंतर या आदिवासी मच्छिमारांच्या सुटकेसाठी खासदार राजेंद्र गावित यांनी संसदेत आवाज उठवला. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा यांनीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन खलाशांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानंतर आता अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. या पाचही खलाशांची सुटका करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मच्छीमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याने तेथील मेरीटाईम सिक्युरिटी बोर्डाच्या जवानांनी चार डिसेंबर 2019 रोजी पालघर जिल्ह्यातील विलास कोंढारी, जितेश पाचलकर, जयंत पाचलकर, जितेश दिवा, अर्जुन डावरे यांना अटक केली होती. तेव्हापासून ते पाकिस्तानच्या दांडी तुरुंगात कैदेत होते मॅक्स महाराष्ट्राच्या सातत्याच्या पाठपुराव्याने त्याचबरोबर खासदार राजेंद्र गावित यांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नाने या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आले आहे. या पाच जणांना वाघा बॉर्डर पर्यंत सोडले. त्यानंतर पंजाब होऊन बडोद्यापर्यंत ट्रेनने आले. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी वेरावल येथे आणण्यात आले. वैद्यकिय तपासणी झाल्यानंतर रस्ते मार्गे त्यांनी पालघर गाठले. सुटका झालेले विलास कोंडारी हे तलासरीच्या घेवरपाडाचे रहिवासी आहेत. तर जयंत पासलकर हे पिता पुत्र तलासरीच्या पाटिल पाड्यात राहतात. जिथे दिवस डहाणूच्या जांबुगांव तर अर्जुन डावरे डहाणूतील सरावली चेहऱ्यावरचे आहेत हे सर्व मच्छीमार सही सलामतपणे आपल्या घरी परतल्याने त्यांचे नातेवाईक कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याचरोबर त्यांच्या आदिवासी पाड्यांवर जणू दिवाळीच्या सणाइतका आनंद पहायला मिळत आहे. तसेच अद्यापही अनेक आदिवासी खलाशी हे पाकिस्तानात कैद आहेत. त्यांच्या सुट्टीसाठी देखील मॅक्स महाराष्ट्र सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.

Tags:    

Similar News