सोने ४ महिन्यांच्या उच्चाकांवर,१४ वर्षानंतर चांदीच्या दरातही नवा उच्चांक
मुंबई : जागतिक बाजारातील अस्थिरता तसेच सणासुदीमुळे वाढलेली मागणी यामुळे सोने आणि चांदीच्या दराने नवा विक्रम केलाय.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे, तर चांदीने तब्बल १४ वर्षांनंतर नवा उच्चांक गाठला आहे.भारतात एक तोळे सोन्याचा दर हा १ लाख ६ हजार रुपयांपर्यंत पोहचलाय. तर एक किलो चांदीचा दर हा १ लाख २४ हजार ४७० रुपयांपर्यंत पोहचलाय.
सोन्याचा नवा उच्चांक
ऑक्टोबर कॉन्ट्रॅक्टसाठी गोल्ड फ्युचर्समध्ये तब्बल २.०३% (₹२,११३/१० ग्रॅम) वाढ होऊन दर ₹१,०५,९३७/१० ग्रॅम इतक्या उच्चांकावर पोहोचले. तर डिसेंबर कॉन्ट्रॅक्टमध्ये सोन्याचे दर १.६% (₹१,६८२/१० ग्रॅम) उसळून ₹१,०६,५२९/१० ग्रॅम या विक्रमी पातळीवर गेले.
चांदीची झेप
डिसेंबर कॉन्ट्रॅक्टसाठी सिल्व्हर फ्युचर्समध्ये २.१३% (₹२,५९७/किलो) वाढ झाली असून, दर ₹१,२४,४७०/किलो या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले.
सोनं आणि चांदीच्या दरात का वाढ झाली ?
आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने लागू केलेल्या नव्या टॅरिफ्समुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत.
सप्टेंबर महिन्यात यूएस फेडरल रिझर्व व्याजदर कपात करेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
भारतामध्ये सणासुदीची आणि लग्नसराईची मागणी वाढली आहे.
चीनच्या सेंट्रल बँकेकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.
जागतिक बाजारातील अनिश्चितता, तसेच देशांतर्गत मागणी लक्षात घेता सोन्या-चांदीच्या किमतींतील ही झळाळी काही काळ टिकून राहू शकते,अशी माहिती तज्ज्ञांनी दिलीय.