मध्यरात्री रंगले रेमडेसिवीर चौकशी नाट्य: विरोधी पक्षनेते फडणवीस, दरेकर डीसीपी कार्यालयात

राज्यातील कोरोना त्सुनामीनंतर आरोग्यव्यवस्था कोसळली असताना कोरोना उपचारात बरे करणारा दावा करणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनवरुन दिवसभराच्या आरोप प्रत्यारोपानवनंतर ब्रुक फार्माच्या संचालकांना मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर DCP कार्यालयात दाखल होत महाराष्ट्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप केला.

Update: 2021-04-18 01:10 GMT

प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी काही दिवसांपूर्वी ग्रुप फार्मा या कंपनीला भेट दिली होती. ही कंपनी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होती. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि लाड यांनी ही इंजेक्शन आपण महाराष्ट्र सरकारला देऊ, असे जाहीरही केले होते. या विषयी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत काही बैठकाही झाल्या होत्या. त्यानंतर राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व्यवस्थित सुरू होईल असी शक्यता व्यक्त होऊ लागली होती.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. परंतु रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यासह देशात तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शनिवारी(१७ एप्रिल) दिवसभर आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. यांनतर आता दमणमधील रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निर्यात बंदी असल्यामुळे या कंपनीकडे २० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पडून असल्याचे आढळले आहे.

ब्रुक फार्मा ग्रुप कंपनीचे मालक राजेश जैन यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत, पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात नेण्यात आले. यानंतर राज्याचे विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड DCP कार्यालयात दाखल झाले होते. काही दिवसांपूर्वी दरेकरांनी दमन दौरा केला होता. यावेळी प्रसाद लाडही होते या दौऱ्यामध्ये त्यांनी राज्याला ५० हजार रेमडेसिवीर देणार असल्याची घोषणा केली होती. याबाबत त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री रांजेंद्र शिंगणे यांच्याशी परवानगी बाबत चर्चा केली होती. परंतु त्याच कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेतल्याने आता रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या वादामध्ये ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता संचालकांवर काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि काही मंत्र्यांना लोकांच्या जीवाचे काही घेण-देण नाही आहे. यांना फक्त राजकारण करायचे आहे. मलिक यांनी केलेल्या आरोपांवर केंद्रीय मंत्री मांडविया यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी कंपन्यांची नावे सांगण्यास सांगितले होते परंतु कोणत्याही कंपन्यांचे नाव मलिक यांनी सांगितले नाही. उलट केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करते आहे. परंतु राज्य सरकारमधील मंत्री आपली जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकण्याचे काम करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


चार दिवसांपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नका असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे, असे मलिक यांनी म्हटले. त्यानंतर भाजप नेत्यांनी मलिक आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर मलिक यांनी आक्रमक होत गुजरातमधील सर्व कंपन्यांचा माल जप्त करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई सुरू झाली.

दरेकर आणि आमदार प्रसाद लाड दमनमधील ब्रुक फार्मा कंपनीत गेले होते. यावेळी त्यांनी ब्रुक फार्माच्या संचालकांना महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची मागणी केली होती. यावर संचालकांनी सांगितले की इंजेक्शनचा पुरवठा करु मात्र आम्हाला परवानगी नाही. यानंतर केंद्र सरकारमधील मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी संपर्क केला आणि महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्यासाठी एक्सपोर्ट लायसन्स देण्याची मागणी केली. यानंतर मांडविया यांनी रेड्डीज सोबत संपर्क करुन दिला. यानंतर दोन्ही राज्यातील एफडीए कडून परवानगी मिळवली होती यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळणार होते. परंतु महाराष्ट्राच्या एफडीएचे अधिकाऱ्यांच्या पीएने त्यांना फोन करुन धमकावले की विरोधकांना कसे काय तुम्ही माल देत आहात आम्हाला दिले पाहिजे, असा आरोप आहे.

Tags:    

Similar News