मराठा आरक्षण: सुपर न्युमररी म्हणजे काय?

Update: 2021-05-05 11:53 GMT

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने दिलेले मराठा आरक्षण आज अवैध ठरवलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार संभाजी राजे भोसले यांनी राज्य सरकारने आता सुपर न्युमररी अधिकाराचा वापर करावा. अशी मागणी केली आहे.

सुपर न्युमररी अधिकार म्हणजे राज्यशासनाला अपवादात्मक परिस्थितीत घटनेने काही अधिकार दिले आहेत. त्या अधिकाराला सुपर न्यमररी असं म्हणतात. या अधिकारानुसार राज्य सरकारला घटनेने भरती प्रक्रियेत, शैक्षणिक प्रवेश करताना पदांच्या तसंच प्रवेशाच्या जागा वाढवण्याचे अधिकार दिलेले असतात.

या अधिकाराचा वापर करुन राज्य सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा. तसंच ही पद्धत सरकारने तातडीने अंमलात आणावी. त्यासाठी शिक्षणात वाढीव जागा द्याव्या. तशी सूचना शिक्षण संस्थांना करावी. अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे.

पाहा काय म्हटलंय संभाजी राजे यांनी

Tags:    

Similar News