विदर्भ मराठवाडयाला जोडणार १६ पुल ... , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Update: 2023-01-12 12:48 GMT

विदर्भ मराठवाड्यातील लोंकाचा पाणी प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे .विदर्भ मराठवाडा नद्यांना जोडणाऱ्या पुलांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकीत नांदेडसह यवतमाळ जिल्ह्यातील पाणी व सिंचनाप्रकल्पाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता देण्यात आली आहे. ही बैठक खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने घेण्यात आली आहे.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव सोळंके, कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ संतोष तिरमनवार आदी अधिकारी या बैठकीस हजर होते.

मराठवाडा आणि विदर्भासाठी नवीन प्रकल्प ठरणार संजीवनी ....

उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरण ते निम्म पेनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रापर्यंत एकूण ०७ बंधारे प्रस्तावित असुन या प्रकल्पाचा फायदा नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी तालुकांना होणार असुन जवळजवळ 1000 गावाना फायदा होणार आहे .या प्रकल्पाचा फायदा पुसद, उमरखेड, महागाव या तालुक्यांना होणार असून मराठवाड्यातील कळमनुरी, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट तालुक्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समीतीकडून मान्यता घेण्याचे निर्देश दिले आहे .या प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाडयातील सुमारे १० हजार ६१० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण होणार आहे .

पूर्णा नदीवर पोटा, जोडपरळी, पिंपळगाव कुटे, ममदापूर याठिकाणी चार बंधारे बांधण्यास तांत्रिक मान्यता मिळाली असुन या मुळे हिंगोली व परभणी जिल्हातील ५६०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असुन यांचा फायदा हिंगोली व परभणी जिल्हातील गावाना होणार आहे .विदर्भ व मराठवाड्यातील जोडणाऱ्या १६ पुलामुळे यवतमाळ, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांमधील गावे या पुलांमुळे जोडली जाणार असुन या भागातील ऊस, हळद उत्पादक शेतकऱ्यांचा या पुलांमुळे किमान ४० किमी फेरी वाचणार असुन यामुळे कच्च्यामालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे होणार आहेत.

Tags:    

Similar News