Rahul Gandhi : मी सत्तेत जन्माला आलो पण मला सत्तेत रस नाही

Update: 2022-04-09 12:51 GMT

मी सत्तेत जन्माला आलो पण मला सत्तेत रस नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. 'The Dalit Truth' पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. "देशाने मला प्रेम दिलं आणि चपलाही मारल्या, कारण देश मला आणखी शिकण्यास सांगतो आहे, असेही राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले आहे. दलितांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत बोलताना राहुल गांधी यांनी सावकरांचा उल्लेख केला, पण हा उल्लेख करताना त्यांनी सावरकरजी असा उल्लेख केला. त्यानंतर त्यांनी थांबून आपल्याला जी म्हणायचे नव्हते पण आपल्यावर संस्कार असल्याने तसे बोलून गेलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Full View

Tags:    

Similar News