तेव्हा फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील – शरद पवार

Update: 2023-06-26 11:04 GMT

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच शाब्दिक सामना रंगलाय. याची सुरूवात देवेंद्र फडणवीसांनी केली. त्यांनी १९७८ सालातील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत पवारांवर टीका केली होती. १९७८ मध्ये शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे ४० आमदार फोडून भाजपबरोबर सरकार स्थापन केल्याचं सांगितलं होतं. म्हणजे तेव्हा पवार साहेबांनी केलं ती मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर ती गद्दारी ? असं कसं चालेल असा खोचक सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.

फडणवीसांच्या या प्रश्नावर शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, मी कधी मुत्सद्देगिरी केली ते त्यांनी सांगाव. त्यावेळी आम्ही सरकार बनवल तेव्हा भाजप माझ्यासोबत होती. त्यावेळी फडणवीस लहान असतील, त्यामुळं त्यांना कळलं नसेल. त्यांना पुरेसा इतिहास माहिती नसेल. त्यावेळी ते कदाचित प्राथमिक शाळेत असतील, त्यामुळं त्यांना तेव्हाची फारशी माहिती नसेल. ते अज्ञानापोटी असं वक्तव्य करत आहेत. यापेक्षा फारसं भाष्य करण्याची आवश्यकता नसल्याचा टोलाही पवारांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

Full View

Tags:    

Similar News