चीनमधील कोरोना रुग्णांची परिस्थिती नियंत्रणापलिकडे; 24 तासात ३ कोटी ७० लाख कोरोना रुग्णांची नोंद.

Update: 2022-12-24 10:20 GMT

संपूर्ण जगात कोरोना पसरवणा-या चीनला अजूनही त्यांच्याच देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. मागील काही दिवसांपूर्वी नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना रूग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे इतर देशांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. चीनमध्ये २०२२ च्या डिसेंबर महिन्यातील पहिल्या २० दिवसात २४ कोटी ९० लाख कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनच्या रुग्णालयात देखील उपचारांसाठी जागा रुग्णांना अपुरी पडत आहे.

मागील २४ तासात चीनमधील ३ कोटी ७० लाख नवीन कोरोना रुग्णांची संख्या आढळून आली आहे. त्यामुळे जपान, अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, यासारख्या देशात भयानक परिस्थिती पाहयाला मिळतेय. तसेच दक्षिण कोरिया आणि फ्रान्स मध्ये गेल्या २४ तासात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ लाख ११ हजार पर्यंत पोहचला आहे. तर जपानमध्ये गेल्या २४ तासात १ लाख १७ हजार कोरोना रुग्ण संख्या आढळून आली आहे. जपानच्या माहितीनुसार कोरोनाची ही ८ वी लाट आहे. तर अमेरिकेत हेल्थ एजन्सीनुसार ११.२ टक्के कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पोहचला आहे.

Tags:    

Similar News