वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली

Update: 2021-08-27 12:58 GMT

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये सध्या निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली असली तरी सद्यस्थितीत वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वन्य प्राण्यांनी उभ्या पिकात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने सोयाबीन पिकासह इतर पिकांची नासाडी होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे काही शेतकरी तर या रात्रीचा पहारा देत आहेत.

आधीच सततच्या आस्मानी आणि सुल्तानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्गाने चांगली साथ दिली, वेळेवर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पिकं देखील चांगली आली. मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी वन्य प्राण्यांनी पिकांमध्ये धुडगूस घातल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे, यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

त्यात रात्रीचा पहारा देताना रान डुक्करांसह इतर वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण झाला आहे. वनविभागाकडे अशा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Tags:    

Similar News