कोरोनाच्या संकटानंतर बेरोजगारीवर काम करु: सुनिल तटकरे

Update: 2021-05-26 14:41 GMT

तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला मोठा तडाखा बसला आहे. कोरोना संकटाबरोबर गेल्या वर्षीचं निसर्ग चक्रीवादळ आणि आता तोक्ते चक्रीवादळ अश्या तिहेरी संकटांचा सामना कोकणवासीयांना करावा लागत आहे. त्यामुळं चौहोबाजूंनी संकटात वेढलेल्या कोकणवासियांना सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

गेल्या वर्षीचं आलेलं वादळ जून महिन्यातील वादळ होतं. यंदा झालेलं तौक्ते वादळ हे मे महिन्यात येऊन धडकलं. त्यामुळं आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या चक्रीवादातून झालेल्या नुकसानीनंतर कोकणाला पुन्हा एकदा उभं करण्यासाठी कोकणाला मोठ्या आर्थिक मदतीसाठी राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे.

कोकणातील सद्यस्थिती संदर्भात आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्याशी बातचीत केली. यावेळी आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी कोरोनामुळं आणि या चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. हा बेरोजगारीचा प्रश्न एक खासदार म्हणून तुम्ही कसा सोडवणार असा सवाल केला होता. यावर अगोदर कोरोनाच्या संकटातून आपण बाहेर पडू या. पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती व नवनवीन दालने व बेरोजगारीच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकारने योग्य ते निर्णय घेतलेले आहेत. कोरोनातुन मुक्त झाल्यावर या कामांना गती मिळेल असे उत्तर खासदार सुनिल तटकरे यांनी दिलं आहे.

Full View

Tags:    

Similar News