धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेले बडे अधिकारी होम क्वारंटाईन

Update: 2020-06-13 10:42 GMT

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे dhannjay munde हे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनतर शनिवारी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हेसुद्धा होम क्वारंटाईन झाले आहेत. पालकमत्री धनंजय मुंडे ( dhannjay munde ) यांच्यासोबत जे पोलीस सुरक्षेसाठी होते त्यांच्या संपर्कात आल्याने बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा

ठाकरे सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खासगी लॅबचे शुल्क केले कमी

लालूप्रसाद नावाचा ताठ कणा !

#कोरोनाशी_लढा : कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर

धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या स्टाफमधले पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कोरोना तपासण्या झाल्या आहेत. दरम्यान धनंजय मुंडे dhannjay munde यांच्यावर मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत

Similar News