बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर हल्ला

Update: 2022-06-25 08:11 GMT

पुणे - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत. पहायला मिळत आहेत. अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे.ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यानंतर तानाजी सावंत आणि त्यांचे कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि आणि घराबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

राज्यभरात विविध ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत. पोलिसांनी बंडखोर आमदारांच्या घरांबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबईतही कुर्ला येथे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर शुक्रवारी शिवसैनिकांनी हल्ला केला होता.

Full View
Tags:    

Similar News