पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच सोशल मीडियावर

Update: 2021-07-23 10:51 GMT

अश्लील फिल्म बनवल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हीचा पती राज कुंद्रा(Raj Kundra) याला पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्रा हाच या अश्लील फिल्म प्रकरणाचा सूत्रधार असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)दिली आहे. यानंतर कोर्टाने राज कुंद्रा याला पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली. ४ कुंद्रा आणि रायन थारप या कारवाईनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, तसेच ती सोशल मीडियापासूनही लांब राहिली होती. त्याचबरोबर तिने आपले शूटिंगचे सर्व कार्यक्रम रद्द केले होते.



पण अखेर शिल्पा शेट्टीने आपले मौन सोडले आहे. पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. एका जेम्स थर्बर या लेखकाच्या पुस्तकातील एक उतारा शिल्पा शेट्टीने शेअर केला आहे.

त्यामध्ये ती म्हणते, "संतापाच्या भरात भुतकाळात जाऊ नका आणि भीतीने भविष्याचा विचार करु नका..केवळ जागरुक राहा आणि चहूबाजूला पाहा...."



आपण संतापलो की भुतकाळात ज्यांनी आपल्याला दुखावलेले आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला नैराश्य आले आहे किंवा जे दुर्दैव आपण भोगले आहे, त्या लोकांचा आपण विचार करतो. आपली नोकरी जाईल, आपण आजारी पडू किंवा आपल्या व्यक्तीच्या मृत्यूची भीती....

इथे आपल्याला योग्य ते करावे लागेल. सध्या जे झाले आहे किंवा जे होऊ शकले असते त्याचा विचारु करुन बेचैन व्हायला नको...पण याबाबत जागरुक रहावे लागेल.




 



मी दीर्घ श्वास घेते आणि विचार करते, मी भाग्यवान आहे की मी जिवंत आहे, मी भूतकाळातील आव्हानांशी लढली आहे आणि भविष्यातील आव्हानांशीही लढणार आहे. कोणतीही गोष्ट मला माझे आयुष्य जगण्यापासून रोखू शकत नाही."

शिल्पा शेट्टीने एवढे दिवस मौन पाळले होते. पण आताही ती व्यक्त झाली असली तरी तिने अतिशय सावधगिरी बाळगत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Tags:    

Similar News