समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

Update: 2022-02-20 07:24 GMT

आर्यन खान प्रकरणामुळे एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे चर्चेत आले होते. तर त्यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाची फसवणूक केल्याचे कारण देत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

समीर वानखेडे यांनी वयाची माहिती दडवून ठाणे शहरात सद्गुरू बार अँड रेस्टॉरंट हे हॉटेल सुरू केले होते. तर त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोपरी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीच्या आधारे ठाणे शहरातील कोपरी येथे समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1996-97 साली समीर वानखेडे यांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यामुळे ते करार करण्यास पात्र नसतानाही त्यांनी सद्गुरू बार अँड रेस्टॉरंटच्या करारनाम्यात स्टँप पेपरवर आपले नाव घेतले आहे. त्यामुळे त्यांनी वय लपवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने नवाब मलिक यांच्या तक्रारीच्या आधारे तपास करत 2 फेब्रुवारी रोजी समीर वानखेडे यांच्या बार आणि रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाशी येथील सद्गुरू हॉटेलचा परवाना समीर वानखेडे यांनी 27 ऑक्टोबर 1997 मिळवला होता. त्यानंतर त्याचे नतुनिकरण करण्यात आले होते. मात्र नवाब मलिक यांनी तक्रार दिल्यानंतर हा परवाना रद्द केला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने समीर वानखेडे यांच्या बार अँड रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना रद्द केल्यानंतर समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यामध्ये समीर वानखेडे म्हणाले की, आयआरएस सेवेमध्ये दाखल होण्याआधी हा परवाना आपल्या नावे होता. तर या परवान्यासंबंधीचे सर्व कायदेशीर हक्क त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले होते. तर याबाबतची संपुर्ण माहिती स्थावर मालमत्तेमध्ये करत असून त्यात बेकायदेशीर काही नाही, असे सांगितले.



Tags:    

Similar News