Maratha Reservation : संभाजीराजे यांचे २६ फेब्रुवारीपासून उपोषण

Update: 2022-02-14 06:51 GMT

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने आंदोलन करणारे आणि आक्रमक भूमिका घेणारे संभाजीराजे यांनी आता आपला निर्णय जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करुनही अद्याप निर्णय होत नसल्याने आता संभाजीराजे यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. संभाजीराजे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. मुंबईतील आझाद मैदानावर २६ फेब्रवारीपासून आपण उपोषण करणार आहोत, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

मराठा समाज हा सुद्धा एका वंचित समाज असल्याने आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली आहे. गेल्या काही महिन्यात आपण अनेक आंदोलने केली आहे, पण कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सरकार कोणतीही तयारी दाखवत नसल्याने आपण आता उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपण सर्व नेत्यांच्या दारी गेलो, मूक आंदोलनं केली पण त्याची कोणतीही दखल घेतली गेली नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे.

मराठा_आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्यांबाबत समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचार विनिमय करून आपण हा निर्णय घेतल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News