हाफकिन संस्थेची जमिनी विकून तिचा विस्तार करा: महेश झगडे

Update: 2021-04-11 10:31 GMT

कोरोना लसीकरणावरून सध्या देशाचे राजकारण तापले आहे. याच अनुषंगाने वैद्यकशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान याबाबत राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे काय परिणाम होतात. हे आपण सध्या पाहत आहोत. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवत लस संशोधन आणि निर्मितीत अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाफकिनला करोना प्रतिबंधित लस उत्पादन करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागितली आहे.

हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांना कोरोना लस तयार करण्याची टेक्नॉलॉजी हस्तांतरण करण्यासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शनाने परवानगी मिळावी. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. त्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून लसीच्या क्षेत्रात काम करणारी हाफकिन संस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी या संस्थेचा आत्तापर्यंत विस्तार का होऊ शकला नाही. तसंच या संस्थेचं महत्त्व नक्की काय आहे. या संदर्भात शासनाला पत्र लिहून या संस्थेच्या विस्ताराची मागणी केली आहे.

यासाठी त्यांनी दक्षिण मुबंईतील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी असलेली हाफकिन संस्थेची जमीन विकून इतर ठिकाणी भविष्याचा विचार करून हाफकिन संस्थेचा विस्तार करावा. अशी मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी शासनाला एक प्रस्ताव देखील पाठवला आहे. काय आहे हा प्रस्ताव?






 


 


Tags:    

Similar News