मुंबईत धडकणार भगवं वादळ..! राज्यातील 3 लाख मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येणार

Update: 2023-12-24 05:54 GMT

राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा पेच निर्माण झाला आहे, गेली अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आणि मोर्चे थांबवणार नसल्याचे मराठा आंदोलक म्हणतात त्यांमुळे हे आंदोलनाचं वादळ आता मुंबईच्या दिशेन निघालं आहे.

एकीकडे मराठा समाज हा सर्वात मोठ्या संख्येने असल्यामुळे सर्वात जास्त साखर कारखाने मराठा समाजाचे, सर्वात जास्त पतसंस्था मराठा समाजाच्या, सर्वात जास्त जमिनी मराठा समाजाच्या, सर्वात जास्त लोकसंख्या मराठा समाजाची, सर्वात जास्त आमदार मराठा समाजाचे, सर्वात जास्त खासदार मराठा समाजाचे, तरी देखील अनेक वर्षापासूनचा आरक्षणाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नाही. मात्र, गेले चार महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे याच्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि तेव्हापासूनच आरक्षणाच्या मागणीची ठिणगी पेटली, या अगोदर देखील मराठा समाजाने 58 मोर्चे काढले हे मोर्चे मात्र निष्फळ ठरले यामध्ये अनेक तरुणांनी आपलं बलिदान दिलं. मात्र, तरीही सरकारला जाग आली नाही

बीड येथील जाहिर सभेमधून अखेर मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा बांधवांनी एक घोषणा केली की आता आंदोलन किंवा मोर्चे काढून हे आरक्षण मिळणार नाही तर आपल्याला मुंबईकडे आगे कुच करावी लागेल, आणि काल अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची तारीख ठरली आणि 20 जानेवारीला पायी मुंबईकडे महाराष्ट्रातील मराठा समाज जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News