रोड रोमियोला भुमाता ब्रिगेडने दिला चोप

Update: 2023-09-13 11:41 GMT

बदलापूरमध्ये एका रोडरोमियोला काही जणांनी चोप दिलाय. सामाजिक कार्यकर्त्या मीना साळवी यांचा पाठलाग करणे, त्यांच्या सोसायटीत येऊन शेजाऱ्यांच्याकडे चौकशी करणे आणि व्हाट्सअप वर मेसेज करणे याने त्रस्त झालेल्या मीना साळवी यांनी प्रवीण म्हसकर या रोड रोमियोला भुमाता ब्रिगेडच्या माध्यमातून चांगलाच चोप दिला.

मीना साळवी आणि त्यांची मुलगी या कात्रप रोड वरील हॉटेलात जाऊन परत येत असताना रोड रोमियो प्रवीण म्हसकर याने पाहिले आणि तेवढ्या 10 मिनिटात त्याने त्यांच्या बाजूने 5/6 फेऱ्या मारल्या. इतकेच नाही तर त्यांचा फ्लॅट शोधण्यासाठी त्यांच्या बिल्डिंगमध्ये जाऊन शेजाऱ्यांना खोटी कारणे आणि नावे सांगून शोध घेऊ लागला. इतकेच काय त्याने मीना साळवी यांचा नंबर मिळवत रात्री अपरात्री मेसेज केल्याचं ही सांगण्यात आलं आहे.

मीना साळवी यांना वाटले की सामाजिक क्षेत्रातील विरोधकांनी मागे लावले असेल , मात्र जेंव्हा त्याची रोमियोगिरी समोर आली तसा त्याला कपडे काढून चोप दिला.

Tags:    

Similar News