पालघर जिल्हा अधिकारी कार्यालयात रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Update: 2019-10-03 16:53 GMT

जिल्हाधिकारी कार्यालयात एका रिक्षाचालकाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव गणेश दामू भोर असे असून तो नालासोपारा, सेंट्रल पार्क येथील रहिवासी आहे.

हा व्यक्ती 70 टक्के भाजला असून पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला मुंबई येथे हलविण्यात आले आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या केबिनमध्ये हा प्रकार घडला असून या रिक्षाचालकाला त्याने घेतलेल्या सदनिके मध्ये फसवणूक केल्या प्रकरणी त्याने हा आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे समजते.या मध्ये निवाशी उपजिल्हाधिकारी जखमी झाले आहेत.

Similar News