परप्रांतीय कामगारांची वापसी सुरु!

Update: 2020-06-18 19:59 GMT

लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद थर्मल तपासणी करण्यात येत आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लाँकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने वापस येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगड सह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास साडे पंधरा हजार कामगार येत आहेत.

यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. त्या यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद, तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या हातावर होम काँरंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम काँरंटाईन Home Quarantine साठी पाठवण्यात येते. मुंबई मध्ये बेस्ट मार्फत पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

राज्यातील गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः ४ ते ५ हजार तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात ११ ते ११.५० हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत.

हे ही वाचा:-

कोरोना ने रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली!

Tiktok, YouTube, Facebook वर पोस्ट करताना जरा जपून? खावी लागू शकते जेलची हवा…

सध्या मर्यादित रेल्वे सुरू असल्याने ही संख्या कमी आहे, पण आपल्याकडील उद्योगधंदे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत निश्चितच वाढ होईल. त्यावेळी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले.

Similar News