Republic Day | प्रजासत्ताक दिनी Indian Navy च्या परेडचं नेतृत्व करणारी ले. कमांडर दिशा अमृत कोण आहे ?

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय नौदलाच्या ले. कमांडर दिशा अमृत नेतृत्व करणार आहेत. पण लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत कोम आहेत? जाणून घेण्यासाठी वाचा...

Update: 2023-01-24 03:06 GMT

प्रजासत्ताक दिनाची तयारीला सुरूवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनी मार्चिंग कंटिंजेंट परेडसाठी वायुसेना, नौदल आणि लष्कराकडून जोरदार तयारी सुरू आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आयोजनात भारतीय नौदलाच्या (Indian Navy )परेडचं नेतृत्व लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत (Lt Commander Disha Amrith) करणार आहे. ले. कमांडर दिशा अमृत नौसेनेच्या १४४ नौदल सैनिकांच्या तुकडीचं नेतृत्व करणार आहे.

नौदलानं नुकतीच आपल्या परेडची रंगीत तालीम केली. यावेळच्या परेडमध्ये सागरी सीमेच्या रक्षणामध्ये महिलाशक्तीची झलक दिसणार असल्याचं नौदलानं स्पष्ट केलंय. त्यामुळं दिशा अमृतचं नौदलाच्या कंटिंजेंट परेडचं (contingent parade) नेतृत्व करणं हे स्त्री शक्तीचं उदाहरण असल्याचं नौदलानं सांगितलं. लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत शिवाय नौदलाच्या कंटिजेंट मध्ये अजून एक महिला अधिकारी-सब लेफ्टनंट वल्ली मीना एस सोबत तीन तुकड्या सहभागी होणार आहेत.

लेफ्टनंट कमांडर दिशा अमृत याआधीही २०८ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाली होती. मात्र, तेव्हा दिशा NCC ची ज्युनिअर कैडेट होती. दिशा म्हणते, त्याचवेळी माझं स्वप्न होतं की, एक दिवस मी याच परेडमध्ये एक अधिकारी म्हणून सहभागी होईल. लहानपणी पाहिलेलं तेच स्वप्न आता पूर्ण होतंय. २००८ नंतर सशस्त्र बलात सहभागी होऊन मी प्रजासत्ताक दिनामध्ये (Republic Day) सहभागी होण्याचं स्वप्न पाहत होते. भारतीय नौदलाचं परेडमध्ये नेतृत्व करण्याची मिळालेली संधी ही माझ्यासाठी अद्भुत क्षण असल्याची भावनिक प्रतिक्रिया दिशानं प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

Tags:    

Similar News