रेमडीसिवीरला पर्याय आहे – डॉ. अमोल कोल्हे

सध्या राज्यात रेमडीसिवीर इंजेक्शनची मागणी, तुटवडा आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल हा चर्चेचा विषय आहे. पण या इंजेक्शनचा उपयोग काय आहे, या इंजेक्शनला पर्याय आहे का याबद्दल सांगत आहेत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे....

Update: 2021-04-17 03:20 GMT

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर रेमडिसिवीर इंजेक्शन मिळाले तरच रुग्णाला त्याचा चांगला उपयोग होतो असा समज लोकांमध्ये पसरला आहे. त्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करत आहेत. या इंजेक्शनचा काळा बाजार सुरू आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आवाहन केले आहे.

"रेमडिसिवीरच्या वापराबाबत कोविड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय पण ते आता मिळत नाही. या परिस्थितीत काय करावे?

लक्षात घ्या,रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही.शरीरातील विषाणूंचा भार कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही तर कोविड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर सुचविलं आहे. ते रुग्णाला द्यावं. शासन व प्रशासन रेमडिसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

परंतु सातत्याने वाढती रुग्णसंख्येमुळे याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोविड टास्क फोर्सने सुचविलेली औषधे रुग्णांना देता येतील. पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, रेमडिसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. त्यामुळे ते रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे अशी माझी नम्र विनंती आहे."

Tags:    

Similar News