लेशपालचे कौतूक पण बघ्यांचं आश्चर्य; राज ठाकरे यांचे सरकावरही टीकास्र

पुण्यातील घटनेवरून राज ठाकरे यांनी ट्वीट करत सरकारवर टीकास्र सोडले आहे.

Update: 2023-06-28 07:16 GMT

पुण्यात 19 वर्षीय इंटेरियर डिझाईन करणाऱ्या युवतीवर तिच्या मित्राने कोयत्याने हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखत लेशपाल जवळके नावाच्या एमपीएससी करणाऱ्या युवकाने प्रसंगावधान राखल्याने तरुणीचा जीव वाचला. यानंतर राज ठाकरे यांनी ट्वीट करून लेशपालचे कौतूक करत बघ्यांची भूमिका घेणाऱ्या लोकांबद्दल आश्चर्य व्यक्त केले. तसेच यावेळी सरकारवर टीकाही केली.

राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं. त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात? ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित. पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.

दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल, हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी, असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

तसेच माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की, असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा, असंही राज ठाकरे या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.


Tags:    

Similar News