लोकांचे जीव जातील, मोदींची वसूली थांबणार नाही, राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

Update: 2021-05-08 09:51 GMT

देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कॉंग्रेस नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात लॉकडाऊनची मागणी केली होती. त्यानंतर राहुल यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत सरकारवर हल्ला केला आहे.

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Modi) निशाना साधताना

''जनता के प्राण जाएं पर PM की टैक्स वसूली ना जाए!''

असं ट्वीट केलं आहे, देशातील वाढती कोरोना महामारी गंभीर रुप घेत असताना देशातील सर्वच राज्य कोरोना महामारीमुळे हतबल झाले आहेत. रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. अशा परिस्थितीत सरकार कोरोना लसीवर (Corona Vaccine) 5 टक्के जीएसटी (GST) लावत आहेत. याचा राहुल गांधी यांनी विरोध केला आहे.

केंद्र सरकारने लसींवर 5 टक्के जीएसटी लावला आहे.

काही दिवसांपुर्वी राजस्थान आणि छत्तीसगढ़ सरकार ने केंद्राने लावलेल्या या जीएसटीचा विरोध केला होता. 5 टक्के जीएसटी च्या सोबत राज्याला वॅक्सीन च्या एका डोसमागे 15 ते 20 रुपये अतिरिक्त द्यावे लागत आहेत.

केंद्र सरकार ने परदेशातून आलेल्या लसीला कर लावलेला नाही. मात्र, Made In India म्हणजे देशात तयार केलेल्या लसीला कर लावला आहे. कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन लसी सध्या देशात तयार होत आहेत. या दोनही लसीवर राज्य सरकारने 5 टक्के जीएसटी लावला आहे. हा कर हटवण्याची मागणी राहुल यांनी केली आहे.

Tags:    

Similar News