चिदंबरम यांना अटक झाल्यानंतर रात्रभर काय घडलं? जाणून घ्या या 10 मुद्यातून

Update: 2019-08-22 03:38 GMT

कॉंग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री, अर्थमंत्री पी चिदंबरम यांना INX मीडिया प्रकरणी त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. मात्र, नक्की कशा पद्धतीने हे सर्व प्रकरण घडलं जाणून घ्या या 10 मुद्द्यातून

8 : 10 मिनिटांनी पी चिदंबरम कॉंग्रेस कार्यालयात दाखल

8 : 12 मिनिटांनी चिदंबरम यांची प्रेस कॉन्फरन्स संपली

8 : 25 मिनिटांनी चिदंबरम घराकडे रवाना

8 : 50 मिनिटांनी सीबीआयची टीम चिदंबरम यांच्या घरी पोहोचली

8 : 55 मिनिटांनी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी सीबीआय टीम चिदंबरम यांच्या घराच्या गेटवरुन आत शिरली

पी चिदंबरम यांना अटक, काय घडलं आत्तापर्यंत?

9 : 40 चिदंबरम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

9 : 54 मिनिटांनी चिदंबरम यांना राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये मेडीकल तपासणी करण्यासाठी आणण्यात आले.

10 : 17 मिनिटांनी चिदंबरम यांना सीबीआयच्या ताब्यात द्यायचे की ईडीच्या ताब्यात द्यायचे यावर चर्चा

10 : 25 मिनिटांनी चिदंबरम यांना सीबीआय मुख्यालयात आणले गेले

त्यानंतर रात्री त्यांना सीबीआयच्या विशेष अतिथी गृहातील सुट नंबर पाचमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Similar News