मराठवाड्याच्या परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यांतील प्रकल्पांत केवळ 45 टक्के पाणीसाठा धनंजय सोळंके, प्रतिनिधी

Update: 2023-08-06 06:16 GMT

संभाजीनगर : आधी पावसाची प्रतीक्षा, नंतर अतिवृष्टी आणि आता पुन्हा पावसाची प्रतीक्षा लागली आहे. जेमतेम पाऊस झाल्याने नांदेडसह परभणी, हिंगोली,लातूर, बीड या जिल्ह्यातील प्रकल्प कोरडेच आहेत. या प्रकल्पांमध्ये केवळ ४५ टक्के पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता रब्बीची चिंता सतावत आहे.

मागील वर्षी दमदार पाऊस झाला, पण यावर्षी मुळातच पावसाळ्याला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे प्रकल्पात जमा झालेला पाणीसाठा वापरण्यात आला.त्यामुळे प्रकल्प आता रिकामे आहेत. दरम्यान जुलै महिन्यात जेमतेम चार दिवस झालेल्या पावसाने प्रकल्पांतील पाणीसाठा, वाढण्याऐवजी नुकसानच अधिक केले आहे. त्यामुळे मराठवाड्याच्या जिल्ह्यांतील

येलदरी प्रकल्पात59, तर नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात 52 टक्के पाणी साठा आहे. तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या येलदरी प्रकल्पात सद्य:स्थितीला 59 टक्के पाणी साठा झाला आहे. तर नांदेड शहराच्या पिण्याची भिस्त असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात 52 टक्के जलसंचय झाला आहे. दुसरीकडे मानार प्रकल्पावर हजारो हेक्टर शेतजमिनीच्या सिंचनाची भिस्त असते. या प्रकल्पात अवघा 38 टक्के पाणीसाठा आहे. ही आकडेवारी पाहता,मराठवाड्यातील या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरण्यांविषयी चिंता वाढलीय.

मान्सून सुरू होऊन दोन महिने उलटले तरी मराठवाड्याच्या या प्रकल्पात मुबलक पाणीसाठा नाहीये. त्यामुळे जेमतेम निम्मा पावसाळा शिल्लक असताना अपेक्षित पाणीसाठा झालाच नाही.

कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा?

नांदेड : 329 दलघमी (45.25 टक्के)

परभणी: ४४ दलघमी (40.75 टक्के)

हिंगोली : 541 दलघमी (57.02टक्के)

Tags:    

Similar News