विरोधकांनी लवकर गोळ्या खाव्यात, आजार गंभीर आहे – चित्रा वाघ

Update: 2023-10-11 09:31 GMT

नांदेडच्या शासकीय रूग्णालयातील रूग्णांच्या मृत्यूनंतर सुरू झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नांदेडच्या रूग्णालयातील नवजात बालकांच्या मातांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादातील वक्तव्याचा विरोधकांनी विपर्यास केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी करत विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय.

दरम्यान चित्रा वाघ म्हणाल्या की "माझं जे वक्तव्य आहे ते इतकं स्पष्ट आहे, जर आई कुपोषित असेल तर ती सुदृढ बाळाला कशी काय जन्म देऊ शकते ? जर आईनं गरोदरपणात आवश्यक कॅल्शियम, विटॅमिन- आयनच्या गोळ्या नीट खाल्ल्या नाही तर त्याचा परिणाम तिच्या पोटातल्या बाळावर होतोच" असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होत परंतु या वाक्याचा विपर्यास विरोधकांनी केल्याने त्या म्हणाल्या "विपर्यास करणा-या विरोधकांची मनस्थिती समजू शकते. तुम्ही पण डॅाक्टरला दाखवून घ्या एकदा. आणि गोळ्या घ्यायला उशीर करू नका. कारण तुमचा आजार गंभीर आहे. असल्याची टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे. 


Full View

Tags:    

Similar News