दिल्लीतही कोरोनाने परिस्थिती बिघडली, आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तुटले

Update: 2021-04-14 16:49 GMT

देशात कोरोनाने रौद्र रुप धारण केलं आहे. महाराष्ट्रात दररोज 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत असताना तिकडे राजधानी दिल्लीमध्ये आज आत्तापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

गेल्या 24 तासात दिल्लीमध्ये 17 हजार 282 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहें.

 मंगळवारी सकाळी 13 हजार 468 नवीन रुग्ण समोर आले होते. 30 नोव्हेंबरला 108 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज 30 नोव्हेंबरच्या तुलनेत 104 लोकांचा मृत्यू झाला आहे. 30 नोव्हेबर नंतरची सर्वात मोठी आकडेवारी आहे. दिल्लीतील कोरोना टेस्ट नंतर पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण देखील 16 टक्क्यांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये पहिल्यांदाचा सक्रिय रुग्णांची संख्या 50 हजारांच्या वर गेली आहे.

कोरोनाचा धोका लक्षात घेता दिल्लीमधील CBSE च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीमधील रुग्णांमध्ये कोरोनाची नवीन लक्षण आढळल्याचं वृत्त आहे.

Tags:    

Similar News