धक्कादायक प्रकार: लोकं मरत असताना राष्ट्रवादी नेते भरवतायत पक्ष प्रवेश सोहळे

सर्वसामान्यांवर कारवाई करणारं प्रशासन 'या' नेत्यांवर सुद्धा कारवाई करणार का?

Update: 2021-05-18 03:41 GMT

राज्यात सोमवारी एकीकडे पाचशे पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे जीव गेला असताना, दुसरीकडे औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं पक्ष प्रवेशाचे सोहळा दिमाखात सुरू होता. शेकडो तरुणांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत पक्षाच्या कार्यालयात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या काही दिवसांपासून सत्तेत असलेल्या पक्षातील नेते कोरोनाचे नियमांना केराची टोपली दाखवत, विविध कार्यक्रमांना गर्दी करत असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लोकांना नियम पाळण्याचे अहवाहन करतात तर, दुसरीकडे त्यांचेच नेते कोरोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचं आता नेहमीचचं झालं आहे.

सोमवारी औरंगाबादमध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षात इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष कदिर मौलाना यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली.

विशेष म्हणजे यावेळी अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हते, सोशल डिस्टंसिंग सुद्धा कुणीच पाळत नसल्याचे दिसून आले. खुद्द कदिर मौलाना यांनी काही ठिकाणी मास्क घातला नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे सर्वसामान्यांवर कारवाई करणारं प्रशासन सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर सुद्धा कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

याबाबत कदिर मौलाना यांच्यासोबत संपर्क करून त्यांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही पर्यंत केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

Tags:    

Similar News