पुढच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचेही झेंडे लागतील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Update: 2023-07-10 14:16 GMT

काही दिवसानपूर्वी गडचिरोली येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहिल्यांदाच उपस्थित राहीले होते. आज धुळ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. विकासाच्या त्रिशूळामुळे विरोधी पक्षाला धडकी भरली आहे, पायाखालील वाळु सरकली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली.


एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेना भाजपची युती २५ वर्षाची आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचे झेंडे लागले आहेत. परंतु लोकांना अंगवळणी पडायला वेळ लागतो. पुढच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचेही झेंडे लागतील. असं प्रत्युत्तर शिंदे यांनी अजित पवार यांना दिले. ते पुढे म्हणाले की महाराष्ट्राती महायुतीच्या विकासाच्या कामाला साथ देण्यासाठी अजित पवार सरकारसोबत आले त्यामुळे आणखी ताकद वाढली असल्याचं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आपलं सरकार हा विकासाचा त्रिशूळ आहे. जिकडे बघावं तिकडे आपल्या सरकारला पाठिंबा मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक आरोप करीत आहेत. त्यांचा संघर्ष मोठा आहे. बाळासाहेबांचं स्वप्नही मोदी साहेब पूर्ण करीत आहेत. अयोध्येतलं राम मंदिर, कलम ३७० हटवणं हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं.

Tags:    

Similar News