शरद पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

Update: 2022-02-01 05:03 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण आता शरद पवार यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. शरद पवार यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. "माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी लवकर बरे व्हावे यासाठी माझ्यावर उपचार करणारे डॉक्टर, मला शुभेच्छा देणारे मित्र, सहकारी या सर्वांचा मी आभारी आहे." असे शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. तसेच आपल्याला कोणताही त्रास होत नसून प्रकृती व्यवस्थित असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण शरद पवार यांचे वय पाहता त्यांच्या प्रकृतीबाबत अनेकांना चिंता होती. पवारांना कोरोनाची लागण होताच अनेक बड्या नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शरद पवार यांना फोन करुन विचारपूस केली होती. आता शरद पवार हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे ते पुढच्या काही दिवसात पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता आहे.

Similar News