Video: राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आत्ताच युती करावी, नाना पटोले यांचं मोठं विधान

पाणी कुठं मुरतंय? प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर नाना पटोले यांची चपखल प्रतिक्रिया

Update: 2021-06-23 12:29 GMT

courtesy social media

स्वबळावर निवडणूका लढण्याची भाषा करणारे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. नक्की त्यांची स्वबळावर निवडणूका लढण्याची तयारी का आहे? यामागे त्यांची भूमिका नक्की काय आहे. राज्यात राजकीय वातावरण बदललं आहे का? या सर्व प्रश्नांवर मॅक्समहाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी बातचीत केली.

यावेळी नाना पटोले यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेनेने आत्ताच युती करावी असं आव्हान या दोन पक्षांना दिलं आहे. पटोले यांच्या स्वबळाच्या ना-यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. तर सामना वर्तमानपत्रातही नाना पटोले आणि कॉग्रेसवर टीकात्मक लेख सुरू आहेत. कॉग्रसेने आपला चेहरा बदलला असून जनमत वाढत असल्याने अनेकांना कॉग्रेसची भीती वाटत आहे. असंही मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.

शरद पवार यांच्या तिस-या आघाडीबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले... पवार यांचा हा उपक्रम सुरूच असतो पण कॉग्रेस वगळून तिसरी आघाडी होऊ शकत नाही. असा दावाही त्यांनी केला.

प्रताप सरनाईक यांनी जे पत्र लिहीले आहे ते जर वाचले तर कुठे पाणी मुरत आहे? हे स्पष्ट होईल असं सांगून भाजप हा आमचा एक नंबरचा शत्रू असून कॉग्रेस हिंमतीने लढेल असं ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या कॉमन मीनीमम प्रोगामवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आम्ही भेट मागितली आहे. त्या बैठकीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असा खुलासाही पटोले यांनी केलाय. नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसबाबत नक्की काय म्हटलंय...Full View

Tags:    

Similar News