Nawab Malik Bail : उच्च न्यायालयाचा नवाब मलिक यांना दणका, जामीनावर तातडीने सुनावणीस नकार

Nawab Malik : शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापोठापाठ अनिल देशमुख यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीनावर उच्च न्यायालयाने तातडीने जामीन देण्यास नकार दिला. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Update: 2022-12-13 12:01 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडी सरकार असताना मंत्रीपद भुषवलेले नवाब मलिक 23 फेब्रुवारीपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर तात्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 1993 बाँबस्फोटातील आरोपींकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता. हा व्यवहार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे नबाव मलिक यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर नवाब मलिक यांची कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड येथील जमीन, कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा ईडीकडून जप्त करण्यात आली होती. त्यानंतर उस्मानाबाद येथील मलिक यांची 148 एकर जमीन जप्त करण्यात आली होती. त्याबरोबरच कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट आणि वांद्रे पश्चिम येथील 2 राहती घरं ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्यवर असलेले हे सर्व आरोप गंभीर आहेत. त्यामुळे त्यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्याबरोबरच नवाब मलिक हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांचे वैद्यकीय कारण ग्राह्य धरता येणार नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.


Tags:    

Similar News