Mumbai Cruise Drug Case: सुनील पाटील मास्टर माईंड! मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

Update: 2021-11-06 08:01 GMT

मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणात दररोज नवनवीन आरोप केले जात आहेत. एकीकडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी या हे प्रकरण शांत होण्याचं नाव घेत नसल्याचं दिसून येत आहे. आर्यन खान प्रकरणाचा तपास आता तपास अधिकारी समीर वानखेडेंऐवजी दिल्ली NCB ची टीम करणार असल्याची माहिती समोर आलेली असताना, आज शनिवार 11 नोव्हेंबरला भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरण धुळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुनिल पाटील यांनी रचल्याचा गंभीर आरोप कंबोज यांनी केला आहे. तसंच सुनिल पाटील राज्यात गृहविभागात बदलीचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. पाहा काय म्हटलंय मोहित कंबोज यांनी?

Full View

Tags:    

Similar News