Bullet Train tender : देशातील पहिला समुद्रातील भुयारी मार्ग होणार मुंबईत, निविदा जारी

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पासाठी मुंबईतून 21 किलोमीटर समुद्राच्या तळातून भुयारी मार्गाने धावणार आहे. त्यामुळे या भुयारी मार्गासाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशनने टेंडर (Tender) मागवले आहेत.

Update: 2022-09-24 06:53 GMT

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत मुंबईत समुद्राच्या तळाशी असलेला भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. हा देशातील समुद्रातील पहिला भुयारी बोगदा असणार आहे. यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने टेंडर मागवले आहेत. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पातील मुंबईतील वांद्रे कुर्ला काँप्लेक्स आणि शीळफाटा येथे भुमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी बोगदा (Underground Tunnel) बांधण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाने निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पासाठी 21 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. त्यापैकी समुद्राच्या तळाशी बांधण्यात येणारा हा भुयारी मार्ग 7 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

समुद्राखाली सात किलोमीटर इतक्या लांबीचा बांधला जाणारा हा देशातील पहिलाच बोगदा असणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेल्या माहितीनुसार टनेल बोरिंग मशिनच्या माध्यमातून निविदा मागवण्यात आल्या आहेत. तर उर्वरित बोगद्यासाठी पाच किलोमीटर लांबीचा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड या मशिनचा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितली आहे.


Tags:    

Similar News