उदयनराजे यांचे गाणे आणि रडणे.....सातारकरांचे मानले आभार

Update: 2021-12-24 09:52 GMT

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वागण्या बोलण्याची कायमच चर्चा होत असते....पण उदयनराजे गातात देखील...याचा अनुभन सातारकरांनी नुकताच आला आहे. एवढेच नाही तर उदयनराजे यांच्या डोळ्यात अश्रू आलेले देखील सातारकरांनी पाहिले...सातारा नगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागल्याने सातारचे राजकारण तापू लागले आहे. सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन शुभारंभ करताना खासदार उदयनराजे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसले यांना आव्हान दिले. हिंमत असले तर आमच्या समोर येण्याचे धाडस दाखवा, असे खुले आव्हान देत त्यांच्यवर टीका देखील केली. तर सातारकरांनी नेमीच दाखवलेल्या प्रेमाबद्दल बोलताना उदयनराजेंच्या अश्रूंचा बांध फुटला. याचवेळी विरोधकांच्या वैयक्तिक टिकेला उत्तर देताना 'काय बाय सांगू कास ग सांगू मलाच माझी वाटे लाज' हे गाणे म्हणत विरोधकांना टोला लगावला.


Full View

Tags:    

Similar News