'देशविरोधी घोषणाबाजी हा चिंतेचा विषय' ; खासदार संजय राऊत यांनी व्हिडीओ केला पोस्ट

Update: 2021-10-26 03:05 GMT

T-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर काश्मीरमध्ये जल्लोष करत, भारत विरोधी घोषणाबाजी करतांनाचा व्हिडीओ ट्विट करत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह असताना काश्मीरमध्ये देशविरोधी घोषणाबाजी देणे हा चिंतेचा विषय असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे काश्मीरमध्ये असताना, पाकिस्तानी संघाच्या टी- 20 विजयाचा आणि हिंदुस्तानच्या पराभवाचा अशा पद्धतीने जल्लोष साजरा करणे, आणि हिंदुस्तान विरोधी घोषणा देणे हा निश्चितपणे चिंतेचा विषय आहे. केंद्र सरकार ने याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. सोबतच राऊत यांनी याबाबतचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यात काही लोक थाळ्या बडवताना दिसत आहेत, तर काही लोक फटाके उडवून घोषणा देताना दिसत आहे

Tags:    

Similar News