दिलासा : राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढली

Update: 2021-05-04 15:52 GMT

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने सगळ्यांची चिंता वाढलेली असताना आता थोडी दिलासादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासात राज्यात मंगळवारी ६५,९३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ४१ लाख ०७ हजार ९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.१६% एवढे झाले आहे. तर राज्यात मंगळवारी आज राज्यात ५१ हजार ८८० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात मंगळवारी ८९१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे. सध्या राज्यात ३९ लाख ३६ हजार ३२३ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर ३० हजार ३५६ व्यक्ती संस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण ६ लाख ४१ हजार ९१० एक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पट

दरम्यान मुंबईत मंगळवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबईत मंगळवारी 5 हजार 240 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2554 रुग्ण आढळले आहेत. तर 24 तासात मुंबईत 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 27 एप्रिल ते 3 मे या काळात मुंबईत रुग्णवाढीचा दर 0. 58 टक्के एवढा झाला आहे.

मुंबईपेक्षा पुण्यात जास्त रुग्ण आढळले आहेत. पुण्यात 3003 रुग्ण आढळले असून 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूरमध्ये 2689 रुग्ण आढळले असून 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.




 


Tags:    

Similar News