Mumbai Heavy Rainfall: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Update: 2021-06-09 05:38 GMT

मुंबईत पहिल्याचं पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईची मध्य रेल्वेची लोकल सेवा देखील विस्कळीत झाली आहे. सायन, किंग्ज सर्कल परिसरात पाणी साचलं असून मुंबईत कोरोनामुळं अगोदरच लोकल सेवा बंद असल्यानं लोकांना मोठा त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

भारतीय हवामान खात्यानं महाराष्ट्रात मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rainfall) दिला आहे. तसंच उर्वरीत महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, अमरावती, नांदेड या भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाने मुंबई शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं असून साचलेल्या पाण्याने ट्राफीक जामचा सामना मुंबई करांना करावा लागत आहे. सध्या मध्य रेल्वेवरील सीएसएमटी-कुर्ला स्थानकादरम्यानची अप दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News