आंबेडकर परिवाराच्या सदस्यांवर टीका, नितिन राऊत वक्तव्य मागे घेणार?

Update: 2022-03-02 07:39 GMT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवारातील सदस्य आहेत म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, पण त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले आहेत का ते पाहा, अशी टीका ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. पण आत आंबेडकर परिवारावरील या टीकेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. राऊत यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी रिपाईच्या खरात गटाचे सचिन खरात यांनी केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन राऊत यांनी यासंदर्भात टीका केली होती. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे आपण वारसदार नसलो तरी त्यांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे राऊत यांनी म्हटले होते. आंबेडकर परिवाराचे सदस्य असलेले काही जण आंबेडकरी समाजाची दिशाभूल करत आहेत, असा आरोप त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता केला. फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत म्हणून एखाद्या नेत्याला दैवत म्हणणे चुकीचे आहे, अशी टीका त्यांनी केली होती.

पण आता त्यांच्या या वक्तव्याला आरपीआयच्या खरात गटाच्या सचिन खरात यांनी आक्षेप घेतला आहे. नितीन राऊत यांनी आंबेडकर परिवाराबद्दल जे वक्तव्य केलं आहे ते मागे घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माणूस बनविले. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी धम्माचे कार्य आयुष्यभर केले. आजही आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्यासह त्यांची सर्व मुले आंबेडकरी विचारांचे समाजकारण आणि धम्माचे कार्य करत आहेत. आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पाया पडतो, मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवाराच्या पाया पडलो तर तुमच्या पोटात का दुखतं? तुम्ही हे केलेलं वक्त्यव्य मागे घ्यावं" अशी मागणी खरात यांनी केली आहे.

Tags:    

Similar News