मिल्कोमीटर, वजन काटे माध्यमातून दूध उत्पादकांची लूट...

Update: 2023-01-26 12:30 GMT

फॅट व एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर यंत्रामध्ये व दूध प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वजन काटे यंत्रामध्ये फेरफार करून शेतकऱ्यांची राज्यभर लूटमार सुरू आहे. असा आरोप शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

राज्यात शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुध व्यवसायाकडे पाहिले जाते. आणि शेतकरी हा व्यवसाय शेती सोबत करतो. मात्र शेतकऱ्यांची यामध्ये मोठ्याप्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. फॅट व एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिल्कोमिटर यंत्रामध्ये व दूध प्रमाण मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वजन काटे यंत्रामध्ये फेरफार करून शेतकऱ्यांची राज्यभर लूटमार सुरू आहे. असा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केला आहे. मिल्कोमिटर यंत्रांच्या प्रमाणीकरणाची कोणतीही शासकीय यंत्रणा राज्यात कार्यरत नाही. दूध संकलन केंद्रावरील वजन काट्यांची नियमित तपासणी होत नसल्याने चुकीची मापे दाखवूनही शेतकऱ्यांना लुटले जात आहे. ही लुट थांबवा असे शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले आहे.

दुधाचे दर, फॅट व एस.एन.एफ. नुसार ठरत असतात. फॅट व एस.एन.एफ. मध्ये थोडा जरी बदल झाला तरी दूध उत्पादकाला मोठा तोटा होतो. वजन मापनातील फरकामुळेही शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व राज्यात तातडीने दुग्ध विकास विभागाची स्वतंत्र मिल्कोमिटर व वजन काटे प्रमाणीकरण यंत्रणा उभारून दूध उत्पादकांची लुट थांबवावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात येत आहे. असे डॉ. अजित नवले यांनी स्पष्ट केले आहे.

Tags:    

Similar News