राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट हवामान खात्याचा इशारा

Update: 2023-11-25 10:58 GMT

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर आणि मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात २६ आणि २७ नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पाऊसासह गारपीटही होण्याचा अंदाज व्यक्त केलाय.तसेच २६ नोव्हेंबर रोजी विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र मराठावडा ऑरेंज अलर्ट -

अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाच्या आसाची निर्मिती झाली आहे. पश्चिम किनार पट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करीत आहेत. त्यामुळे होणाऱ्या परिणामांमुळे गारपीटीची शक्यता वाढली आहे, अस हवामान खात्याने दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, तर मराठावडा भागातील छत्रपती संभाजीनगर येथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण २८ नोव्हेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे.

Tags:    

Similar News