..तर न्यायालय कशाला हवे? : उच्च न्यायालयाचे खडे बोल

तपास करणारे आणि निकाल देणारे तुम्हीच असला तर न्यायालयाचा फायदा काय? आम्ही या ठिकाणी कशासाठी आहोत? सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात वृत्तांकनावरुन रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.

Update: 2021-01-18 12:37 GMT

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात वृत्तांकनावरुन रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे. टीव्ही मीडियावरून सुशांत आत्महत्या प्रकरणात करण्यात आलेल्या वृत्ताकंणात मुंबई पोलिसांवर करण्यात आलेली टीका चुकीची असून गुन्हेगारी प्रकरणात माध्यमांनी वादविवाद करता काम नये. मुंबई पोलिसांच्या तपास हा पहिल्या टप्प्यात असताना त्यावर केलेली टीका चुकीची असल्याचे म्हणत रिपब्लिक टीव्ही आणि टाइम्स नाऊला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी मीडिया रिपोर्टिंगचे नियमन करा अशी मागणी करत याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती दिपांकद दत्ता आणि जी एस कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी अश्या प्रकरणात माध्यमांना वार्तांकन करताना काही मार्गदर्शक सूचना देखील न्यायालयाकडून करण्यात आल्या.तपास करणारे आणि निकाल देणारे तुम्हीच असला तर न्यायालयाचा फायदा काय? आम्ही या ठिकाणी कश्यासाठी आहोत? माध्यमांनी आपल्या मर्यादा ओलांडू नये असे खडे बोल देखील न्यायालयाने सुनावले.

न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीच्या वकील मालविका त्रिवेदी यांना एखाद्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून चालू असताना ती हत्या आहे की आत्महत्या हे स्पस्ट झाले नसताना चॅनेल ही हत्या आहे असं सांगत होत. याला शोध पत्रकारिता म्हणायचं का? असा प्रश देखील विचारला. तपास चालू असलेल्या प्रकरणात माध्यमांवर चर्चा व त्या गुन्ह्याबाबत चालू असलेल्या तापसबाबत वादविवाद अशा गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत. असं देखील उच्च न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News