MaxMaharashtra Hack : हा पत्रकारितेवरील हल्ला आहे - अशोक चव्हाण

Update: 2019-11-10 06:49 GMT

मॅक्समहाराष्ट्रचं (MaxMaharashtra) यूट्युब (Youtube) अकाऊंट हॅक आणि डिलीट करण्यात आलंय. या संदर्भात राज्यातील मॅक्समहाराष्ट्रा च्या वाचकांसह राजकीय प्रतिनिधींनी हे अकाउंट हॅक झाल्य़ाबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी या संदर्भात ट्विट केलं असून चॅनल हॅक व डिलिट करणे हा पत्रकारितेवरील हल्ला आहे. हे कृत्य भ्याड व निंदनीय आहे. सरकारने दोषींवर कारवाई करावी, अशी माझी मागणी केली आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2019 ला 8 वाजता हे अकाउंट हॅक करण्यात आलं.

तर MaxMaharashtra चे हिंदी व्हिडीओ अपलोढ करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या MaxMaharashtra Hindi या अकाउंटवर Porn Video अपलोढ करण्यात आले आहेत. त्यामुळं या चॅनेल ला देखील यूट्युबने कॉपी राईट पाठवला आहे. त्यामुळं आता हे चॅनेल देखील यूट्यब कडून बंद केलं जाण्याची शक्यता आहे.

Full View

Similar News