चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान ; पालकमंत्र्यांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी

Update: 2021-11-21 03:01 GMT

चंद्रपूर : गेल्या आठवड्यात सावली तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले आहे. पावसाने हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले असले तरी शेतकऱ्यांनो खचू नका, असा धीर देत शासन पूर्णपणे तुमच्या पाठिशी असून कोणत्याही परिस्थितीत मदत करू, असा विश्वास राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला.

सावली तालुक्यात नुकसान झालेल्या मुंडाळा, पाथरी, उसरपार , मंगरमेंढा, पालेबारसा, सायखेडा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, सीडीसीसी बँकेचे संचालक संदीप गड्डमवार, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसिलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे शास्त्रज्ञ डॉ. विनोद नागदेवते, स्नेहा वेलादी, सोनाली लोखंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Tags:    

Similar News