Monsoon Rain Update : पुणे-मुंबईत मुसळधार, 7 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

Update: 2023-07-25 02:59 GMT

सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. यात आज ७ जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, काही जिल्हे अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आज कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार असल्याचं हवामान खात्यांचा अंदाज आहे. अशात आजही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आलं आहे. पुणे-मुंबईतही आज अतिमुसळधार पाऊस असण्याची शक्यता वर्तवली आहे. ठाणे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या ७ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलं आहे. या ७ ही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये पुढील आणखी तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याच सांगण्यात आलंय. तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या राज्यात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. 

Tags:    

Similar News