आरोग्य विभागात तात्पुरत्या भरतीचा सरकारचा निर्णय

Update: 2020-08-12 01:59 GMT

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याकरीता कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी तपासणीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवण्यात येणार असून हजारो लोकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणा मजबूत करताना आरोग्य सेवकांच्या तात्पुरत्या नियुक्त्याही केल्या जाणार आहेत, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. बीडमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

या संकटाच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात होणाऱ्या भर्तीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्री मुंडे यावेळी म्हणाले. कोरोना चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी उत्कृष्ट जेवण आणि स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे.

हे ही वाचा...

राज्यात एका दिवसात 10 हजार 14 रुग्ण कोरोनामुक्त

संजय दत्तला कॅन्सर…

“ऐ मौत तूने मुझे ज़मीदार कर दिया”, राहत इंदोरी यांचे कोरोनामुळे निधन

कोरोनाचा संसर्ग लोकांच्या निष्काळजीपणामुळे वाढत आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास कार्यवाही केली जाईल. बीड जिल्ह्यात बाहेर गावी जाऊन आलेल्यांसाठी त्यांच्या निवासाची व्यवस्था शहरात करण्याऐवजी शहराबाहेरील मंगल कार्यालय किंवा इतर इमारतीत केली जावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Similar News