ज्यादा वीजबिल प्रकरणी सरकारचे वीज कंपन्यांना आदेश

Update: 2020-07-15 01:49 GMT

कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर जूनमध्ये गेल्या तीन महिन्यातील एकूण वीज वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत असलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने नवीन आदेश दिले आहेत.

वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही, तसेच अन्यायकारकरित्या कोणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, असे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे. या संदर्भात मंत्रालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा..

बकरी ईद: कुर्बानीचे विधी ऑनलाईन करा- उध्दव ठाकरे

Mission Lotus: मध्यप्रदेश, राजस्थान नंतर आता महाराष्ट्राचा नंबर आहे का?

बोगस बियाणे: काय घडलं कोर्टात?

सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या-त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि तेथे वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात, असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

एकूण वापराच्या वीज बिलाबाबत आर्थिक सहाय्य करण्यात येईल का याबाबतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती नितीन राऊत यांनी दिली.

Similar News