करणी सेनेचे महाराष्ट्र प्रमुख अजय सेंगर यांना पनवेलमध्ये मारहाण

पनवेल, नवी मुंबई – वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रमुख अजय सेंगर यांना आज पनवेलमध्ये मारहाण करण्यात आलीय. संविधानाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत त्यांना मारहाण करण्यात आलीय.

Update: 2023-06-28 07:07 GMT

पनवेलच्या अग्निशमन केंद्राजवळ करणी सेनेचे अजय सिंह सेंगर (Ajay Singh Sengar Karni Sena) आले होते. त्यावेळी त्यांना दोघांनी मारहाण केली. संविधानाविषयी अजय सेंगर सातत्यानं आक्षेपार्ह विधान करत असल्यानं त्यांना मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नथुराम गोडसे यांची जयंती साजरी करणं, म.गांधी यांची जयंती काळा दिवस म्हणन साजरी करणं अशाप्रकारची वादग्रस्त कृत्य अजय सिंह सेंगर यांनी याआधी केली आहेत. दरम्यान, याप्रकरणी सेंगर यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, “ प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं, त्याचा मी निषेध केला होता”. मात्र, मारहाण करणाऱ्या सुभाष गायकवाड यांनी सागर पगारे यांनीही प्रतिक्रिया दिलीय. याआधीही सेंगर यांनी संविधानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी यापुढेही अशी वक्तव्यं केली तर पुन्हा चोप देऊ, असं म्हटलंय.

Tags:    

Similar News