सोयाबीनचे निकृष्ट बियाणे, कृषीमंत्र्यांनी स्थापन केली चौकशी समिती

Update: 2020-06-24 03:03 GMT

सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्याची दखल घेत तक्रारीची पडताळणी तातडीने करण्यासाठी तपासणी पथकाची संख्या वाढवावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. याप्रकरणी संबंधित दोषी कंपन्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना दिली आहे.

सोयाबीन बियाण्यांची उगवण का झाली नाही याच्या अभ्यासासाठी परभणी कृषि विद्यापीठातील सोयाबीनचे शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. बीड, उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करीत असताना शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषिमंत्र्यांकडे केल्या होत्या.

हे ही वाचा..

सदोष बियाणे बनविणाऱ्या कंपनींवर कडक कारवाई करा: नाना पटोले

कापसाच्या शेतीचे अर्थकारण, शेतकरी व आपले लोकप्रतिनिधी!

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ… जबाबदार कोण?

कृषिमंत्र्यांनी काही शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणीही केली. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असेही आवाहनह कृषिमंत्री आपल्या दौऱ्यात शेतकऱ्यांना करीत आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे पेरले व ते उगवून आले नाही अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

Similar News